वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदूरढोक येथील जिल्हा परिषद् प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांनी फिल्टर दिले आहे. यासाठी निवृत्ती पाबळे, उपसरपंच योगेश घंगाळे, विलास बिलवरे या तिघांनी मिळून दहा हजार रुपये किमतीचे फिल्टर उपलब्ध करून दिले.
याप्रसंगी बाळासाहेब बोरगे यांनी पालकांना बिबट्यापासून स्वतःचे व मुलांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. शाळेसाठी पाच हजारांची आर्थिक मदत व ग्रामपंचायतर्फे शाळेत बसवून देण्याचे अश्वासन दिले. तसेच विलास बिलवरे यांनी पाणी दुषित होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शाळेला फिल्टर भेट दिल्याबद्दल निवृत्ती पाबळे, योगेश घंगाळे, विलास बिलवरे यांचा शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.











